Headlines

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संत निरंकारी मंडळ शाखा मलकापूरच्या वतीने पत्रकारांचा प्रत्यक्ष भेट घेऊन सन्मान

मलकापूर दि. 17 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून *संत निरंकारी मंडळ शाखा मलकापूर* यांच्या वतीने मलकापूर शहरातील वरिष्ठ पत्रकारांचा प्रत्यक्ष भेटून सन्मान करण्यात आला.

*सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज* यांच्या मार्गदर्शनाखाली *संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन* ही मिशनची सामाजिक शाखा समाज कल्याणासाठी सदैव कटीबद्ध आहे.
*रक्तदान हे जीवन वाचवण्याबरोबरच मानवतेची भावना सुदृढ करणारे कार्य आहे.* बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या *”रक्त नाड्यांमध्ये वहावे, नाल्यांमध्ये नको”* या दिव्य संदेशातून प्रेरणा घेऊन गेल्या 4 दशकांपासून रक्तदानाचा उपक्रम सुरू आहे. आजवर मिशनद्वारे *14 लाख 50 हजार युनिट रक्तदान* करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे *रेल्वे स्टेशन, सरकारी दवाखाने, बस स्टँड, शहर व ग्रामीण रस्ते यांची स्वच्छता, तसेच नदी-नाले-ओढे, तलावांची ‘अमृत प्रोजेक्ट’ द्वारे साफसफाई, ‘वननेस वन’ प्रकल्पाद्वारे विविध ठिकाणी वृक्षारोपण आणि वनांची निर्मिती, आरोग्य निदान व नेत्र तपासणी शिबिरे* नियमितपणे घेण्यात येतात.
नैसर्गिक आपत्तीमध्ये (अतिवृष्टी, भूकंप, पूरग्रस्त) देखील त्यामध्ये प्रभावित झालेल्या नागरिकांना फाऊंडेशनच्या वतीने मदत केली जाते. *मानवतेची निस्वार्थ सेवा* हाच या सेवेचा मूळ उद्देश आहे.

समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मंडळाच्या सदस्यांनी पत्रकारांची प्रत्यक्ष भेट घेतली.
यावेळी *संत निरंकारी मिशनचे अध्यात्मिक साहित्य देऊन* वरीष्ठ पत्रकार *श्री. वीरसिंग दादा राजपूत – संपादक मलकापूर आजतक,श्री. नितीन पवार -देशोन्नती, श्री. प्रवीण राजपूत – दैनिक सकाळ,श्री. नारायण पानसरे – संपादक दैनिक मराठा दर्शन, श्री. निलेश चोपडे – संपादक द विदर्भ द्वार न्यूज, श्री. उमेश ईटणारे -उपसंपादक विदर्भ लाईव्ह* यांचा सन्मान करण्यात आला.

यादरम्यान *प्रमुख उपस्थिती* म्हणून *मलकापूर शाखा मुखी दयाळूजी चव्हाण* हे उपस्थित होते.
तसेच *श्रीकृष्ण कुयटे – प्रेस कॉर्डिनेटर, मनोहर पाटील – अकाउंटंट, रविंद्र गव्हाळे – सेवादल इन्चार्ज, अजाबसिंग राजपूत, भोजने साहेब* आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!