Headlines

कापड दुकानासमोरून दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा पोलिसांत गुन्हा!

बुलढाणा : शहरातील एका कापड दुकानासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास दिक्षन फुलझाडे (वय ४२, रा. दत्तपूर) यांनी आपली (एमएच-२८-बीसी-६७७९) क्रमांकाची दुचाकी शहरातील एका कापड दुकानाजवळ उभी करून दुकानात गेले होते. काही वेळाने परत आल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.परिसरात शोध घेऊनही दुचाकीचा माग न लागल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!