भरधाव दुझचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

मोताळा :- तरोडा-शिरवा मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरोडा येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत युवकाचे नाव धनराज जोरसिंग मस्से (रा. तरोडा, ता. मोताळा) असे आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ रमेश जोरसिंग मस्से यांनी ११ जून रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास धनराज मस्से हे दुचाकीने तरोडा ते शिरवा मार्गाने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात धनराज मस्से गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!