Headlines

घरात घुसून महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा, मोताळा तालुक्यातील घटना!

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ३० वर्षीय महिला आपल्या घरात झोपलेली होती. यावेळी घराचे दार उघडे असल्याचा फायदा घेत गजानन जयराम हरमकार याने घरात प्रवेश केला. त्याने महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पळून गेला. जाताना त्याने महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गजानन हरमकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ अमोल खराडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!