Headlines

पीएच.डी. पदवीने विज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. पूनम इंगळे यांचे शैक्षणिक यश

मलकापूर :- विज्ञान महाविद्यालय, मलकापूर येथील संगणकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सौ. पूनम महेश इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत संगणकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे.
डॉ. इंगळे यांनी संगणकशास्त्र विषयात सखोल संशोधन करून ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली. त्यांच्या या यशाबद्दल विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक, संशोधन व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही डॉ. इंगळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि संशोधननिष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांनाही संशोधन क्षेत्रात प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
डॉ. पूनम इंगळे यांच्या पीएच.डी. पदवीप्राप्तीमुळे विज्ञान महाविद्यालय, मलकापूरच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची प्राप्त झाली असून, परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!