Headlines

लोखंडी रॉडने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा, नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा : तालुक्यातील नायगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. एका व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, १८ जून रोजी रात्री नायगाव येथे फिर्यादी संतोष प्रल्हाद सपकाळ (वय ३२) यांच्याशी आरोपींनी वाद घातला. यावेळी महेंद्र देविदास सपकाळ याने दारूच्या नशेत लोखंडी रॉडने संतोष सपकाळ यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.
या प्रकरणी संतोष सपकाळ यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिस ठाण्यात महेंद्र देविदास सपकाळ, भगीरती सपकाळ, रविंद्र सपकाळ व राजरत्न रविंद्र सपकाळ (सर्व रा. नायगाव, ता. नांदुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!