Headlines

बसमध्ये चढताना वृद्धाच्या गळ्यातील सोन्याचा गोफ लंपास चिखली बसस्थानकातील घटना; १५ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरीला

उदयनगर : चिखली बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ८० वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लंपास केल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. चोरी गेलेल्या सोन्याच्या ऐवजाची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. उदयनगर येथील प्रतिष्ठित नागरिक तथा स्वस्त धान्य दुकानदार रामकृष्ण गणपत…

Read More

अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; ६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त; कोथळीतील एकाविरुद्ध वनगुन्हा दाखल

खामगाव : नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून तिची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोताळा वनपरिक्षेत्रातील पूर्व कोथळी परिसरात सापळा रचून रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. या कारवाईत ट्रॅक्टरसह ६० घनफूट रेती व अन्य साहित्य असा एकूण ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खामगाव मोताळा वनपरिक्षेत्रांतर्गत पूर्व कोथळी…

Read More

तपोवन येथे ३८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

धा. बढे : मोताळा तालुक्यातील तपोवन येथे ३८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. गावातील मारोती मंदिराजवळील सभामंडपाच्या मोकळ्या जागेत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. राजू गुलाबराव शिकारे असे मृत युवकाचे नाव आहे. तपोवन येथील गुलाबराव मांगो शिकारे (वय ६५) यांनी धा. बढे पोलिसांत दिलेल्या…

Read More

शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शेगाव : शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी कारवाई केली. हरलालका स्कूलजवळ छापा टाकून एका व्यक्तीकडून विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटची पाकिटे असा ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास शेगाव शहर पोलिसांचे कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मिळालेल्या…

Read More

चितोडा शिवारात दुचाकी अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू

खामगाव : तालुक्यातील चितोडा शिवारात दुचाकीचा अपघात होऊन अंबिकापूर येथील ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ज्ञानदेव दगडू धुरंदर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ६ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. ज्ञानदेव धुरंदर हे शेतातील काम आटोपून दुचाकीने अंबिकापूरकडे घरी परतत होते. चितोडा शिवारातून जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यानंतर ते रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडले….

Read More

रामनगरात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड लंपास

चिखली तालुक्यातील रामनगर येथे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घरमालक नातेवाइकांकडे गेले असताना ही चोरी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामनगर येथील रामदास दिगंबर भगत हे ६ ऑगस्ट रोजी…

Read More

शेलोडी शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांवर गुन्हा, ८.४३ लाखांचा मुद्देमाल व रोकड जप्त; मध्यरात्री पोलिसांची कारवाई

खामगाव : शेतातील टिनशेडचा आधार घेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून १३ जणांना कारवाईच्या कचाट्यात आणले. शेलोडी शिवारात ६ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोकड व इतर साहित्य असा एकूण ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने ही कारवाई केली….

Read More

दारूच्या नशेत पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

मेहकर : शहरातील जिजाऊ चौक परिसरात एका ३२ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत युवक गंभीररीत्या भाजला असला तरी वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. अमोल रमेश डाखोरे (३२) असे जखमी युवकाचे नाव आहे. तो मुळचा मांडवा फॉरेस्ट येथील रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी मेहकर…

Read More

नगरपालिकेच्या निष्क्रियतेचा खड्डा; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच! बसस्थानकासमोरील जीवघेणा खड्डा अखेर ऑटोचालकांनी बुजवला; नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर संताप

मलकापूर  ( दिपक इटणारे ) : शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणे ही आता नवी बाब राहिलेली नाही; मात्र खड्डे पडून त्यात नागरिक जखमी होईपर्यंतही प्रशासनाने डोळेझाक करणे, ही मलकापूरकरांच्या जीवाशी खेळण्याची गंभीर बाब आहे. मलकापूर बसस्थानकासमोरील एसटी बस वळण घेणाऱ्या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून पडलेला भला मोठा खड्डा याच प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा जिवंत नमुना ठरला आहे….

Read More

ट्रॅक्टर विक्रीच्या व्यवहारात २७.७४ लाखांचा अपहार; खामगाव शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; ग्राहकांसह कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप

खामगाव : ट्रॅक्टर विक्रीच्या व्यवहारात ग्राहकांकडून प्राप्त झालेली रोख रक्कम, नवीन व जुने ट्रॅक्टर तसेच हिशोबातील रक्कम परस्पर वापरून तब्बल २७ लाख ७४ हजार २०२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत पावत्यांचा भास निर्माण करून फसवणूक केल्याचाही आरोप असून, खामगाव शहर पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तिघांविरुद्ध गुन्हा…

Read More
error: Content is protected !!