Headlines

बसमध्ये चढताना वृद्धाच्या गळ्यातील सोन्याचा गोफ लंपास चिखली बसस्थानकातील घटना; १५ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरीला

उदयनगर : चिखली बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ८० वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लंपास केल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. चोरी गेलेल्या सोन्याच्या ऐवजाची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
उदयनगर येथील प्रतिष्ठित नागरिक तथा स्वस्त धान्य दुकानदार रामकृष्ण गणपत उपाध्ये (वय ८०) आणि डासाळा येथील स्वस्त धान्य दुकानदार गजानन दुधाळे हे दोघे राशन दुकानाच्या कामानिमित्त ६ ऑगस्ट रोजी चिखली येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर ते दोघेही घरी जाण्यासाठी चिखली बसस्थानकात बसची वाट पाहत होते. दरम्यान, बार्शी ते शेगाव बस आल्यानंतर उपाध्ये हे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचा गोफ व ५ ग्रॅम सोन्याचे पेंडल असा एकूण १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला. बसमध्ये चढल्यानंतर काही वेळाने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर उपाध्ये यांनी तत्काळ चिखली पोलिस ठाणे गाठून घटनेबाबत तोंडी फिर्याद दिली. बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!