धा. बढे : मोताळा तालुक्यातील तपोवन येथे ३८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. गावातील मारोती मंदिराजवळील सभामंडपाच्या मोकळ्या जागेत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. राजू गुलाबराव शिकारे असे मृत युवकाचे नाव आहे. तपोवन येथील गुलाबराव मांगो शिकारे (वय ६५) यांनी धा. बढे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा राजू गुलाबराव शिकारे याने गावातील मारोती मंदिराच्या कळसाजवळ असलेल्या सभामंडपाच्या मोकळ्या जागेतील बाहेर आलेल्या लोखंडी गजाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना शनिवारी सकाळी सुमारे ५ वाजता निदर्शनास आली. राजू याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून धा. बढे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सफौ. शरद बाठे करीत आहेत.