मलकापूरात इतिहास जागा झाला ! छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य ऐतिहासिक प्रदर्शनी; शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा जिवंत अनुभव
मलकापूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर शहरात इतिहास अक्षरशः जिवंत झाला असून शिवकालीन शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देणारी भव्य ऐतिहासिक प्रदर्शनी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवशंभू पाईक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनीत शिवकालीन शस्त्रे, दुर्मीळ ऐतिहासिक दस्तावेज, आरमाराच्या प्रतिकृती, प्राचीन नाणी तसेच गड-किल्ल्यांचे भव्य मॉडेल्स पाहण्यासाठी नागरिकांची…
