न्यायालयीन कामासाठी निघालेला शिक्षक काळाच्या पडद्याआड, अपघातानंतर दोन दिवस मृत्यूशी झुंज; मलकापुरात हळहळ
मलकापूर : कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा एक तरुण शिक्षक अखेर काळाच्या पडद्याआड गेला. न्यायालयीन कामासाठी मलकापूरकडे येत असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय भूषण मुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरासह शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. मलकापूर शहरातील जुन्या गाव परिसरातील नसवाला चौक येथे राहणारे भूषण रविंद्र मुळे हे चिखली येथील…
