सायबर पोलिसांची तत्परता; फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला दिलासा; दहा लाखांच्या ऑनलाइन गंड्यातून साडेआठ लाख रुपये परत मिळवून देण्यात यश
बुलढाणा:- ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये बुलढाणा सायबर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मोबाईल हॅक करून तब्बल दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेल्या देऊळगाव राजा येथील शेतकरी सचिन विनायक जपे यांना पोलिसांनी साडेआठ लाखांपेक्षा अधिक रक्कम परत मिळवून दिली. पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण…
