लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती प्रति शेगाव घिर्णी येथे उत्साहात साजरी

घिर्णी – मलकापूर : 1 ऑगस्ट 2026 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपेक्षितांचे कैवारी असणाऱ्या अण्णाभाऊंना यानिमित्ताने अभिवादन करण्यात आले.

मलकापूर तालुक्यातील प्रति शेगाव घिर्णी येथे *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, घिर्णी* आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे लहान मुला-मुलींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित दिलेली भाषणे. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळुंगीचे माजी सरपंच विजय पारेकर होते. त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे नेते दामोदरजी शर्मा उपस्थित होते.

आजच्या शुभदिनी गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बघेले सर यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी अण्णाभाऊंचे पोवाडे, गीत आणि लोकप्रबोधनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, घिर्णी* च्या सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!