मनोज करांगळेची मृत्यूशी झुंज अपयशी; समृद्धी अपघातानंतर चार दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू!

मलकापूर :- शहरातील सावजी फैल येथील युवकाचा समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मनोज अशोक करांगळे (वय २६) असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज करांगळे हे काही दिवसांपूर्वी मुंधडा ऑईल मिलच्या संचालक व त्यांच्या कुटुंबीयांना मुंबई येथे घेऊन गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर, छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एकूण तीन जण जखमी झाले होते. सर्व जखमींना तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी मनोज करांगळे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १५ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!