ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना!

खामगाव : तालुक्यातील निळेगाव फाटा परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रामकृष्ण वाकोडे (वय ५५, रा. आबाद नगर, ता. बाळापूर, जि. अकोला) हे ट्रॅक्टरने जात असताना निळेगाव फाटा, रामनगर शिवार परिसरात अपघात घडला. १९ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.३५ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. या अपघातात वाकोडे हे ट्रॅक्टरखाली दबले गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अंतर्गत मर्ग क्रमांक १७/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!