Headlines

अंघोळीचे अश्लील फोटो काढले; “माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा फोटो व्हायरल करीन; अतिथी रेस्टॉरंट चालकाविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा

शेगाव : शहरातील खामगाव रोडवरील अतिथी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप असून, विरोध केल्यानंतर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग, धमकी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलीस स्टेशनमध्ये अप क्रमांक ३०४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेनुसार ज्ञानेश्वर नरहरी लिप्ते (वय ४५), रा. वान प्रकल्प समोर, शेगाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित महिला ही आरोपीच्या खामगाव रोडवरील हॉटेल अतिथी येथे रोजंदारीवर काम करत होती. कामाच्या दरम्यान आरोपीने महिलेच्या अंघोळीचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर “माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा फोटो व्हायरल करीन,” अशी धमकी देत आरोपीने तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आरोपीने महिलेस हॉटेलच्या छतावर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, पीडितेने प्रतिकार करताच आरोपीने तिला मारहाण करून अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे शेगाव परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!