Headlines

चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मेहकर येथील घटना

मेहकर : कामानिमित्त दुचाकीने मेहकरकडे निघालेल्या २३ वर्षीय तरुणाच्या प्रवासाचा देऊळगाव माळी फाट्यानजीक झालेल्या अपघाताने दुर्दैवी अंत झाला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोमवारी (दि. १४) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. निशीन प्रकाश कापरे (वय २३, रा. देऊळगाव…

Read More

रस्त्यावरच महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेचा बोजवारा

मेहकर : उपचारासाठी रुग्णालयाच्या दारात पोहोचलेल्या गर्भवती महिलेला मदतीचा हात मिळण्याऐवजी रस्त्यावरच प्रसूतीची वेळ येणे, आणि रुग्णालय अवघ्या ५० मीटर अंतरावर असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी बाहेर न येणे, हा प्रकार मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा ठरला आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर…

Read More

दारूच्या नशेत पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

मेहकर : शहरातील जिजाऊ चौक परिसरात एका ३२ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत युवक गंभीररीत्या भाजला असला तरी वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. अमोल रमेश डाखोरे (३२) असे जखमी युवकाचे नाव आहे. तो मुळचा मांडवा फॉरेस्ट येथील रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी मेहकर…

Read More

कारमध्ये तलवार ठेवणाऱ्या इसमाला मेहकर पोलिसांचा दणका; ३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहकर : कारमध्ये धारदार तलवार घेऊन संशयास्पदरीत्या थांबलेल्या एका इसमावर मेहकर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या झडतीत कारच्या मागील सीटवर तलवार आढळून आली. या कारवाईत तलवार व कार असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २८ जुलै रोजी मेहकर पोलिसांना जानेफळ चौक परिसरात एका कारमध्ये इसम तलवार घेऊन…

Read More

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; २७ प्रवासी जखमी

मेहकर :- समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ रविवारी पहाटे खाजगी ट्रॅव्हल्सने समोरील अज्ञात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २७ प्रवासी जखमी झाले. अपघातात १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी झाले असून सर्वांना तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून नागपूरकडे जाणारी एमएच ३१ एफसी ७४६८ क्रमांकाची ट्रॅव्हल्स ८ जून रोजी…

Read More

विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

मेहकर : घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असताना विद्युतप्रवाहाचा जोरदार धक्का लागल्याने २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी शहरातील रामनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव शिंदे (वय २४) हा युवक गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घरी जेवण करत होता….

Read More

खत विक्रीत कथित गैरव्यवहार; कृषी सेवा केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मेहकर : – तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर संशयास्पद ई-पॉस नोंदी करून अनुदानित खतांचा गैरवापर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासानंतर संबंधित कृषी केंद्र चालकाविरुद्ध मेहकर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उद्धव काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उकळी येथील एका शेतकऱ्याने प्रत्यक्षात सहा…

Read More

चार वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा उलगडा; दोघांना अटक, २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी!

मेहकर :- तालुक्यातील सुकळी येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या गुन्ह्याचा तपास नव्याने मिळालेल्या धाग्यावरून पुढे सरकला. आरोपींपैकी एकाच्या पत्नीने दिलेल्या माहितीमुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि…

Read More

समृद्धी महामार्गावर बॅटऱ्यांनी भरलेला ट्रक जळून खाक; चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला

मेहकर :- तालुक्यातील दुसरबीडजवळ मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागून तो काही क्षणांतच जळून खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूर येथील चालक रोहित कुमार हा यूपी ६५ आरडी २१४० क्रमांकाच्या ट्रकमधून बनारस येथून नाशिकच्या दिशेने इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या घेऊन निघाला…

Read More

फर्निचर दुकान फोडून ९७ हजारांचा माल लंपास

मेहकर : शहरालगतच्या चिखली रोडवरील चायगाव फाट्याजवळील मेहकर भाग-२ परिसरात अज्ञात चोरट्यांनी फर्निचर दुकानाचे शटर तोडून सुमारे ९७ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी कैलास प्रकाश गाडे (वय ३६, रा. कल्याणा ता….

Read More
error: Content is protected !!