Headlines

हुंड्याच्या मागणीने साखरपुडा मोडला; सहाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

खामगाव : विवाहासाठी हुंड्याची मागणी करून साखरपुडा मोडत मुलीच्या कुटुंबाची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर फैल परिसरातील ४२ वर्षीय फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कपिल सिद्धार्थ धांडे, सिद्धार्थ मनाजी धांडे, जिजाबाई सिद्धार्थ धांडे, कमला रमेश इंगळे (सर्व रा. बाळापूर, जि. अकोला), सुलक्षणा ऊर्फ सोनल…

Read More

वीजेच्या तडाख्यात शेतकऱ्याची बैलजोडी दगावली; ७० हजारांचे नुकसान, खामगांव तालुक्यातील घटना!

खामगाव:- मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असताना खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथे दुर्दैवी घटना घडली. शेतकरी संजय लक्ष्मण गव्हाणे यांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने त्यांची बैलजोडी जागीच दगावली असून या घटनेत सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २२ व २३ जून रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह…

Read More

पळशीत घर-दुकान फोडून चोरी; ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

खामगाव : तालुक्यातील पळशी बु. येथे अज्ञात चोरट्यांनी घर व दुकानाचे कुलूप तोडून रोकडसह ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली सदानंद धनोकार (वय ४१, रा. पळशी बु., ता. खामगाव) या कटलरी व कापड व्यवसाय…

Read More

चांदमारी परिसरात ६१ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : शहरातील चांदमारी परिसरात एका ६१ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी पुंडलीक तासतोडे (वय ६१, रा. चांदमारी) हे २१ जून रोजी चांदमारी परिसरातील टेकडीवर असलेल्या निंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. गल्लीत…

Read More

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून २५ लाखांची लूट; अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा, दोघे जेरबंद

खामगाव : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याकडून २५ लाखांची रोख रक्कम लुटणाऱ्या दोन तोतया आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत अटक करत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या जलद आणि तांत्रिक तपासामुळे या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला. बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणात आरोपींनी खामगाव येथील एका व्यापाऱ्याला सीबीआय अधिकारी असल्याचा…

Read More

चितोडा येथे ४७ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

खामगाव : तालुक्यातील चितोडा गावात एका ४७ वर्षीय व्यक्तीने नदीकाठावरील स्मशानभूमी परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, धिरेंद्र चक्रधर हिवराळे (वय ४७, रा. चितोडा, ता. खामगाव) यांनी १८ जून रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी…

Read More

खामगाव पोलिसांची गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई; १४ जनावरांची सुटका, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव :- गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करून त्यांची तस्करी करणाऱ्यांविरोधात खामगाव शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी धडक कारवाई केली. टॉवर चौक परिसरात नाकाबंदी दरम्यान तीन संशयित वाहने पकडून १४ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यानजीक बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दादाराव वानखडे (वय ३५, रा….

Read More

घरात एकटाच असताना टोकाचे पाऊल; केला नगरात युवकाची आत्महत्या

खामगाव:- सिव्हिल लाईन परिसरातील केला नगर येथे एका ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल बाळकृष्ण कराळे (वय ३२) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री त्याने घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास…

Read More

दारूच्या नशेत संताप अनावर; कुऱ्हाडीच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

खामगाव :- दारू पिण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद क्षणार्धात हिंसक वळणावर जात एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील वाडी येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता भास्कर जवंजाळ (वय ३७, रा. जुनी वाडी, खामगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून…

Read More
error: Content is protected !!