Headlines

विषारी औषध प्राशन केल्याने ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू

मलकापूर : धोनखेड (ता. मोताळा) येथील ६५ वर्षीय इसमाचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी मलकापूर येथे घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धोनखेड येथील कमलाकर कडु सोनोने (वय ६५) यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी १८ ऑगस्ट रोजी मलकापूर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये…

Read More

मलकापूर बसस्थानकासमोरील स्ट्रीट लाईट सहा महिन्यांपासून बंद; अपघातांसह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मलकापूर : शहरातील मलकापूर बसस्थानकासमोरील बुलढाणा रोडवरील स्ट्रीट लाईट गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत असून, चोरीच्या घटनांनाही अंधाराचा फायदा मिळण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. बुलढाणा रोड हा शहरातील प्रमुख मार्ग असून या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मोठ्या…

Read More

नागपंचमीच्या पावन पर्वावर नागदेवतेचे साक्षात दर्शन! यात्रा महोत्सवातून परतताना सौ. उमाताई तायडे यांच्या वाहनासमोर आला नाग; अनोख्या प्रसंगाची परिसरात चर्चा

मलकापूर/ पिंपळखुटा : नागपंचमीचा पवित्र दिवस… पिंपळखुटा येथील नागपंचमी यात्रा महोत्सवाचे दर्शन घेऊन सौ. उमाताई तायडे घरी परतत होत्या. रात्रीच्या शांत वातावरणात वाहनाने प्रवास सुरू असतानाच अचानक त्यांच्या गाडीसमोर नागदेवता प्रकट झाल्याचा अनुभव त्यांना आला. नागपंचमीच्या दिवशीच घडलेल्या या अनोख्या प्रसंगाने उमाताई तायडे यांच्यासह उपस्थितांच्या मनात श्रद्धेची भावना निर्माण झाली. ‘ज्या दिवशी नागदेवतेची पूजा केली,…

Read More

मलकापूर बसस्थानकात मद्यधुंद इसमाचा धुमाकूळ; पाच एसटी बसच्या काचा फोडून ८० हजारांचे नुकसान, पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर : मलकापूर बसस्थानकात रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत एका इसमाने हातातील लोखंडी रॉडने एसटी बसच्या दर्शनी काचा फोडून धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात पाच एसटी बसच्या काचा फुटून महामंडळाचे तब्बल ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून संबंधित इसमाविरुद्ध सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्य…

Read More

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संत निरंकारी मंडळ शाखा मलकापूरच्या वतीने पत्रकारांचा प्रत्यक्ष भेट घेऊन सन्मान

मलकापूर दि. 17 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून *संत निरंकारी मंडळ शाखा मलकापूर* यांच्या वतीने मलकापूर शहरातील वरिष्ठ पत्रकारांचा प्रत्यक्ष भेटून सन्मान करण्यात आला. *सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज* यांच्या मार्गदर्शनाखाली *संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन* ही मिशनची सामाजिक शाखा समाज कल्याणासाठी सदैव कटीबद्ध आहे. *रक्तदान हे जीवन वाचवण्याबरोबरच मानवतेची भावना सुदृढ करणारे कार्य आहे.* बाबा…

Read More

लोणवडी फाटा व वाघुड येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल

मलकापूर : शहर व परिसरात अवैधरित्या दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन ठिकाणी अवैध दारूचा साठा आढळून आला. लोणवडी फाटा आणि वाघुड येथील कारवाईत एकूण १ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोकॉ रहीमखान हमीदखान पठाण यांनी दिलेल्या…

Read More

80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर युवा पत्रकार रविंद्र गव्हाळे यांचा मानवतेचा संदेश – गरजू पेशंटसाठी केले रक्तदान!

मलकापूर :- देशाच्या _80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या_ पवित्र दिवशी _सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे_, घिर्णी गावचे _युवा पत्रकार श्री. रविंद्र गव्हाळे_ यांनी आज एका _गरजू पेशंटला रक्तदान करून जीवनदान_ दिले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी देखील समाजाप्रती मोठी जबाबदारी घेणारे रविंद्र गव्हाळे हे आतापर्यंत 36 वेळा रक्तदान करून युवांसाठी मोठा आदर्श निर्माण केला आहे. नेहमीच गोर-गरीबांच्या…

Read More

पत्रकारांवर अरेरावी करून ‘तुला पाहून घेण्याची’ धमकी देणाऱ्या वादग्रस्त पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

मलकापूर : तिरंगा रॅलीचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराशी अरेरावी करून ‘तुला पाहून घेईल’ अशी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मलकापूर पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकारांनी दिला आहे. यासंदर्भात मलकापूर पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले. दि….

Read More

तहसील चौकात ट्रकची धडक; ६८ वर्षीय रमेश पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू

मलकापूर : तहसील चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ६८ वर्षीय रमेश पाटील यांचा आज, १४ ऑगस्ट रोजी सकाळी अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती; मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली….

Read More

२३व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; आदित्य भोळे यांच्या निधनाने मलकापूर हळहळले

मलकापूर : पुणे येथे एका कंपनीत नोकरी करणाऱ्या मलकापूर येथील २३ वर्षीय युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे भोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील राधाकृष्ण सोसायटी येथील रहिवासी सौनाली वीरेंद्र भोळे यांचा मुलगा चि. आदित्य रविंद्र भोळे हा पुणे येथे एका…

Read More
error: Content is protected !!