Headlines

मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद हालचाल; चेहरा झाकून बसलेल्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मलकापूर : – रेल्वे स्टेशनशेजारील भाजीपाला मार्केट परिसरात अंधाराचा फायदा घेत चेहरा झाकून संशयास्पदरीत्या लपलेल्या एका तरुणाला मलकापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून परिसरात नियमित गस्त सुरू असताना हा तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे शॉकपचा पाईप आढळून आला. ताब्यात घेतलेल्या तरुणाने आपले…

Read More

भावी इंजिनिअर्सच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ – व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम भव्य सोहळा संपन्न

मलकापूर : -स्थानिक लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या नवप्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘इंडक्शन प्रोग्राम’ आणि ‘पालक सभा’ अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. सदर कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ मंचावरील मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या सोहळ्याला महाविद्यालयाचे मार्गदर्शक…

Read More

नायरा पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात; भरधाव स्विफ्टची ऑटोला मागून जोरदार धडक, ऑटोचा चुराडा, मलकापुरातील पाच जण गंभीर जखमी

मलकापूर : वाघुड-धानोरा परिसरातील नायरा पेट्रोल पंपासमोर भरधाव स्विफ्ट डिझायर कारने ऑटोला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ऑटोचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात ऑटोमधील पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी शेख इरफान शेख इसाक (वय ५०) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रेफर करण्यात आले आहे. तर अन्य जखमींवर मलकापूर…

Read More

ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीतील ‘व्हायरल व्हिडीओ’वरून कारवाई; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या कार्यक्रमादरम्यान दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण करणारे कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असून, शहरातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी पारपेठ प्रभागात ईद-ए-मिलादुन्नबीच्या…

Read More

मलकापूर बसस्थानकासमोर अज्ञात दुचाकीची वृद्धाला धडक; पाय फ्रॅक्चर करून चालक पसार

मलकापूर : शहरातील बुलढाणा रोडवरील संस्कृती फॅशनसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय वृद्धाला अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव वेगात धडक दिल्याची घटना गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात वृद्धाचा उजवा पाय गंभीर जखमी होऊन फ्रॅक्चर झाला असून, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेत आनंदा लक्ष्मण करांडे (वय ७८, रा. हरनखेड) हे…

Read More

दुधलगावातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघे जेरबंद; चार दिवसांची पोलीस कोठडी

मलकापूर : शेतात राहणाऱ्या १९ वर्षीय महिलेवर कोयता-विळ्याचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास करत मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अखेर दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. तब्बल महिनाभरानंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधलगाव बु. येथील लोणवडी…

Read More

काटीतील खूनप्रकरणाचा अखेर छडा; १७ दिवसांनी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

मलकापूर : नांदुरा तालुक्यातील काटी येथे घरफोडीच्या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या ५२ वर्षीय रायसिंग सिताराम सोळंकी यांच्या हत्या प्रकरणाने अखेर तपासात महत्त्वाची वळण घेतले आहे. घटनेनंतर तब्बल १७ दिवसांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील दोन संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याने या प्रकरणातील तपासाकडे आता…

Read More

निरंकारी मिशनच्या हरित महाअभियानाच्या सहाव्या टप्प्यात मलकापूर मध्ये रोपांची लागवड

*मलकापूर(प्रतिनिधी):* संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या अभियानाच्या सहाव्या टप्प्याचे आयोजन मलकापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर समशान भूमी या ठिकाणी मलकापूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री अनिल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तसेच मलकापूर ब्रांच मुखी आदरणीय दयाळूजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनच्या जेष्ठ प्रचारकांनी उत्स्फूर्तपणे…

Read More

मलकापूर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ; माकनेर येथे महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला

मलकापूर:- मलकापूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच काटी येथे एका ग्रामस्थावर धारदार शस्त्राने हल्ला करून एका इसमाला जागीच ठार मारल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता काठी शिवारालगत असलेल्या माकनेर गावात मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास ४ ते ५ चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न…

Read More

मलकापूर बसस्थानकात बस पायावरून गेल्याने वृद्धाच्या पायाचा चुराडा

मलकापूर : बसचे सीट पकडण्यासाठी धावत गेलेल्या एका वृद्धाचा पाय बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याच्या पायाचा चुराडा झाल्याची गंभीर घटना मलकापूर बसस्थानकात २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी वृद्धाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर बसस्थानकात बस क्रमांक  एमएच 06 एस 8046 चा चालक बस रिव्हर्स…

Read More
error: Content is protected !!