सहीसाठी वणवण थांबवा; आठ दिवसांत कारवाई करा! ‘शासन आपल्या दारी’च्या तक्रारीवर अस्तित्व संघटना आक्रमक; तहसीलदारांकडून कारवाईचे आश्वासन, प्रेमलता सोनोने यांचा आंदोलनाचा इशारा
मलकापूर : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्रतिज्ञापत्रांवरील सहीसाठी नागरिक व महा-ई-सेवा केंद्र चालकांना होणाऱ्या कथित हेलपाट्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, याप्रकरणी आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा अस्तित्व संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रेमलता सोनोने यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी गुरुवारी (१३ ऑगस्ट) तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले….
