Headlines

मलकापूर बसस्थानकासमोर मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा; महिलेला धडक, मदतीला धावलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण

मलकापूर : शहरातील वर्दळीच्या मलकापूर बसस्थानकासमोर मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या तीन तरुणांनी एका महिलेला मागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. धडकेत महिला रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे, जखमी महिलेला मदत करण्यासाठी धावून आलेल्या एका शिक्षकालाच मद्यधुंद तरुणांनी बेदम मारहाण केल्याने परिसरात संताप व्यक्त होत…

Read More

फळझाड वाटपातून जलसंवर्धन दिन साजरा वाघुड येथे १५० शेतकऱ्यांना मोफत फळझाडांचे वाटप

वाघुड : जलसंवर्धन दिनाचे औचित्य साधून वाघुड येथे १५० लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत फळझाडांचे वाटप करण्यात आले. एवोनिथ स्टील पुरस्कृत दिलासा संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘तरंग’ प्रकल्पांतर्गत मलकापूर तालुक्यातील १० गावांतील फळबाग लागवडीस इच्छुक शेतकऱ्यांना फळझाडांचा लाभ देण्यात आला. अनुराबाद, वाघुड, पान्हेरा, बहापुरा, हारसोडा, धोंगर्डी, घीर्णी, तांदुळवाडी, बेलाड आणि माकनेर या गावांतील निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना…

Read More

हरणखेड येथील शेतकऱ्यांच्या चार एकर शेतातील वांग्याचे पिक ग्रोथ प्रमोटर फवारल्याने जळून खाक;हजारो रुपयांचे नुकसान

मलकापुर:-: तालुक्यातील हरणखेड येथील सुरेश रमेश चोपडे यांच्या गट नंबर 106 शिवारातील चार एकरातील भरीत वांग्याच्या पिकावर श्रीकर कंपनीचे प्राईम प्रावर हे ग्रोथ प्रमोटर औषधाची दि.18 ऑगस्ट 26 रोजी फवारणी केली थोड्याच वेळात वांग्याची झाडे – झाडांची पाने वाळू लागले आणि वांग्याची झाडे पूर्ण करपली त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबतची तक्रार…

Read More

*वननेस वन – निसर्गासोबत समरसता* *हरित भविष्याच्या दिशेने संत निरंकारी मिशनची व्यापक जनचळवळ*

*मलकापुर(प्रतिनिधी):* बाबा हरदेव सिंह जी यांचा दिव्य संदेश “प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहेत” हा केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश नसून, मानवी चेतना निर्मळ ठेवण्यास आणि निसर्गाप्रती जबाबदार बनण्यास प्रेरणा देणारा संदेश आहे. याच प्रेरणेतून संत निरंकारी मिशन आपल्या पर्यावरण संरक्षणाच्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या उपक्रमाच्या माध्यमातून हरित, संतुलित आणि शाश्वत भविष्याच्या…

Read More

पत्रकाराशी हुज्जत प्रकरणाची पोलिस प्रशासनाकडून दखल; कर्मचाऱ्याला सक्त ताकीद

मलकापूर : वृत्तसंकलनाचे कर्तव्य बजावत असताना पत्रकाराशी हुज्जत घालून अरेरावी केल्याच्या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मलकापूर पत्रकार संघटनेच्या निवेदनानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात समक्ष बोलावून त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला तोंडी सक्त ताकीद (Strict Warning) देण्यात आली आहे….

Read More

लोणवडीतील १८ वर्षीय युवती बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंगची नोंद

मलकापूर : तालुक्यातील लोणवडी येथील १८ वर्षीय युवती घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. कुटुंबीयांनी घरासह शेजारी व गाव परिसरात शोध घेऊनही ती आढळून न आल्याने मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. शारदा बाबुराव सुरडकर, रा. लोणवडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी…

Read More

टोलनाक्यावर  कर्मचाऱ्यांना मारहाण; टिप्पर चालवून आठ ते दहा हजारांचे नुकसान

मलकापूर : दसरखेड टोलनाक्यावर वाहन सोडण्याच्या कारणावरून तीन जणांनी टोलनाका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर संतप्त आरोपींनी दोन टिप्पर टोलनाक्यावरील बाइक लाइनवरून चालवून नेल्याने ट्रॅक, ढापा व वायरिंगचे नुकसान झाले. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुपेन्द्रसिंग विजयकुमार भदोरिया (३५, रा. टोलनाका, दसरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,…

Read More

लाकडाच्या पैशांवरून वाद; चौघांकडून मारहाण, जिवे मारण्याची धमकी

मलकापूर : विकलेल्या लाकडाच्या व्यवहारातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात चौघांनी एका व्यक्तीला शिवीगाळ व लोटपाट करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी आसारीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फातिमा नगर, मलकापूर येथील मोहम्मद शाहरुख मो….

Read More

मोबाईलमध्ये महिलेचे कॉल दिसल्याने वाद; पत्नीला बेल्टने मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : पतीच्या मोबाईलमध्ये एका महिलेच्या कॉलची नोंद आढळून आल्याने विचारणा करणाऱ्या पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण केल्याचा प्रकार मलकापूर शहरातील सिद्धीविनायक नगर येथे घडला. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माधुरी ईश्वर मेसरे (वय ३२, रा. सिद्धीविनायक नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ ऑगस्ट रोजी रात्री…

Read More

वाघुड, वडोदा शिवारातून १ लाख ९० हजारांच्या विद्युत तारांची चोरी

मलकापूर : वाघुड व वडोदा शिवारातील वीज वितरण कंपनीच्या शेतीपंपांच्या डीटीसीवरील लघुदाब वाहिनीची तब्बल १ लाख ९० हजार रुपये किमतीची विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १४ ते १६ ऑगस्टदरम्यान घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी अमोल भास्कर सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाघुड शिवारातील ११…

Read More
error: Content is protected !!