मलकापूर : पुणे येथे एका कंपनीत नोकरी करणाऱ्या मलकापूर येथील २३ वर्षीय युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे भोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील राधाकृष्ण सोसायटी येथील रहिवासी सौनाली वीरेंद्र भोळे यांचा मुलगा चि. आदित्य रविंद्र भोळे हा पुणे येथे एका खासगी कंपनीत कार्यरत होता. १२ ऑगस्ट रोजी छातीत वेदना जाणवू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात उपचार सुरू असताना आदित्य याला हृदयविकाराचे तीव्र झटके आले. डॉक्टरांनी उपचाराचे प्रयत्न केले; मात्र त्याची प्रकृती गंभीर बनत गेली आणि अखेर त्याचे निधन झाले.आदित्यचा मृतदेह १३ ऑगस्ट रोजी मलकापूर येथे आणण्यात आला. शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुण वयात झालेल्या या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.