‘मी शेताकडे जातो’ म्हणत घराबाहेर पडला आणि परतलाच नाही; ऑटोचालकाची हत्या; धरणगावचा ऑटोचालक मृत्यू प्रकरणी आरोपी १२ तासांत गजाआड
मलकापूर:- तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या धरणगाव (ता. मलकापूर) येथील ऑटोचालक अमोल भाऊराव भवरे (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अखेर वेगळी कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला मर्ग म्हणून नोंद झालेल्या या घटनेचा सखोल तपास करत दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत खुनाचा पर्दाफाश करत आरोपीला बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे परिसरात पोलीस तपासाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे….
