मलकापुरात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाही? दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली!
मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहरात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असून, एका नोकरदार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याची घटना मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. जनता महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर ही घटना घडली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अर्बन बँक कॉलनी येथील रहिवासी मेघा विष्णू देशमुख या कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरून…
