घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला; संजय नगरात खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा
देऊळगाव राजा : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दे. राजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीनबी इकबाल खान (वय ३६, रा. संजय नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला…
