Headlines

चिखलीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; सहा ठिकाणी घरफोडी; चार संशयित सीसीटीव्हीत कैद; श्वानपथक व न्यायवैद्यकीय पथकाकडून तपास

चिखली : शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. शाहूनगर आणि पंचमुखी महादेव मंदिर परिसरात रविवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने तब्बल सहा ठिकाणी घरफोडी करत रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले. तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात हत्यारे असलेले चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
चोरट्यांनी इंगळे सर, अनिल सोनुने, संजय अंभोरे, माधव गायकवाड यांच्या घरांना तसेच सुधाकर काळे यांच्या गोडाऊनला लक्ष्य केले. तिरमारे यांच्या घरातही प्रवेशाचा प्रयत्न झाला; मात्र चोरट्यांना तेथून रिकाम्या हाताने परतावे लागले. पंचमुखी महादेव मंदिराजवळील माधव कुंडलिक गायकवाड यांच्या घराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि सव्वा लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीदरम्यान आवाज झाल्याने घरातील व्यक्तींना जाग आली; मात्र अवघ्या काही मिनिटांत चोरटे पसार झाले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार संशयित भिंतीवरून घरात प्रवेश करताना तसेच परिसरात फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक व न्यायवैद्यकीय पथकाला पाचारण केले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!