Headlines

झोडगा येथील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी रिपब्लिकन सेनेचे तहसीलदारांना निवेदन; मूलभूत सुविधांचीही मागणी

  1. मलकापूर : ३१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झोडगा गावातील शेतकरी तसेच नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे स्पॉट पंचनामे करण्यात आले असतानाही अद्याप मदत मिळाली नसल्याने तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच गावातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी १५ सप्टेंबर २०२६ रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

    रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय मोरे इंजिनीयर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संघटक अजय प्रभाकर सावळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी झोडगा येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

    अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह घरांचेही नुकसान झाल्याने बाधित कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. त्याचबरोबर झोडगा गावातील विविध मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

    निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे भीमराव नितोने, संजय वानखडे, प्रताप बिराडे, सुखदेव गव्हाळे, गौतम वाकोडे, भोना मोरे, सुनील वानखेडे, सतीश सावळे, अमोल झनके, संजय झनके, चंद्रभान झनके आणि गोविंदा झनके उपस्थित होते.

    गावकऱ्यांतर्फे अमर सुरवाडे, शिवा पाटील, पवन कुमार गायकवाड, दिलीप प्रभाकर झनके, प्रदीप गायकवाड, विनोद चव्हाण, करण चव्हाण, राजू सिंग दामोदर, सतीश हिवाळे, भागाजी कडूबा हिवाळे, संदीप डाबेराव, दुर्गा सिंग चव्हाण, रमेश मोरे, गुलाब सिंग डाबेराव, नरसिंग डाबेराव, प्रल्हाद वाघ, भगवान इंगळे, सुरेश महाले, गजानन फिरके, विठ्ठल कवठले, विठ्ठल पोडये, सुखदेव आव्हाड, श्रीकृष्ण पोड्ये, सुनील डाबेराव, सुपळा सिंग डाबेराव, गजानन नारखेडे, अजय चव्हाण, संदीप वाघमारे, विनोद मोरे, राजू शेले आणि जगदेव वाघमारे उपस्थित होते.

    महिलांमध्ये मंदाबाई डाबेराव, सविता चव्हाण, विमल चव्हाण, अनिता चव्हाण, जिजाबाई सुरवाडे, साधना सुरवाडे, मनीषा अर्जुन सिंग, ताई राठोड, प्रमिला चव्हाण आणि सुरेखा चव्हाण यांची उपस्थिती होती.

    यावेळी ज्येष्ठ नेते रामभाऊ गवई, प्रकाश नरवाडे, जानराव फुलपगारे, शामराव इंगळे, अजबराव वाघ, पवन गायकवाड, प्रदीप गायकवाड आणि सुदर्शन तायडे यांचीही उपस्थिती होती.

    या निवेदन कार्यक्रमाचे नियोजन रिपब्लिकन सेनेचे युवा नेते मयूर कोंगळे यांनी सहकारी निलेश सोनवणे आणि शिवराज शेलकर यांच्या सहकार्याने केले. प्रशासनाने अतिवृष्टीग्रस्तांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक मदत व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!