मलकापूर :- देशाच्या _80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या_ पवित्र दिवशी _सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे_, घिर्णी गावचे _युवा पत्रकार श्री. रविंद्र गव्हाळे_ यांनी आज एका _गरजू पेशंटला रक्तदान करून जीवनदान_ दिले.
वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी देखील समाजाप्रती मोठी जबाबदारी घेणारे रविंद्र गव्हाळे हे आतापर्यंत 36 वेळा रक्तदान करून युवांसाठी मोठा आदर्श निर्माण केला आहे. नेहमीच गोर-गरीबांच्या प्रश्नांसाठी लढणारे पत्रकार रविंद्र गव्हाळे आज आपल्या कृतीतून पुन्हा एकदा आदर्श बनले. एका रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज असताना त्यांनी तातडीने धाव घेऊन रक्तदान केले. “लेखणीतून अन्यायाविरुद्ध आवाज” आणि “कृतीतून माणुसकी” जपणारे रविंद्र गव्हाळे युवा पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत.