गोठ्याचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न; एकाला पकडले, दोघे पसार

खामगाव : शेतातील काम आटोपून जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला गोठ्याचे कुलूप फोडून चोरीचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी तिघे जण गोठ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. आरडाओरड होताच एक संशयित पकडला गेला, तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैभव एकनाथ वडोदे (वय २७, रा. शेलोडी, ता. खामगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली. १३ ऑगस्ट रोजी रात्री वैभव व त्यांचे वडील शेतीतील काम आटोपून जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी जात होते. त्यावेळी गोठ्याच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप दगडाने फोडून चोरीचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी गजानन बाबुराव गुजर (वय ५०, रा. शेलोडी) याच्यासह आणखी दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वैभव यांनी आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी हालचाल वाढली. त्यात गजानन गुजर याला पकडण्यात यश आले, तर त्याचे दोन साथीदार पसार झाले.
या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!