बांधकामावर काम करताना उंचावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शेगाव : शहरातील जमजम नगर परिसरात निर्माणाधीन इमारतीवर बांधकामाचे काम करत असताना उंचावरून पडल्याने २७ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव शेख समीर शेख चांद (२७, रा. मशिदीजवळ, मेहबूब नगर, खामगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख समीर हा जमजम नगर येथे सुरू असलेल्या बांधकामावर काम करत असताना अचानक तोल जाऊन उंचावरून खाली पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थितांनी त्याला तातडीने सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!