Headlines

बॅनरच्या पैशांच्या वादातून तरुणास मारहाण व जीवे मारण्याची धमकी; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शहरातील वॉटर सप्लाय परिसरात बॅनरच्या पैशांच्या वादातून एका तरुणास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एन.सी. नोंद करण्यात आली आहे.
अमोल रामलाल बच्छीरे (वय २३, रा. रोहीदास नगर, मलकापूर) हे २५ एप्रिल रोजी वाटर सप्लाय परिसरात जात असताना दोन दिवसांपूर्वी बॅनरच्या पैशांवरून झालेल्या वादातून सागर खराटे (रा. मलकापूर) याने त्यांना अडवून मारहाण केली. यावेळी अमोल यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत “एका दिवशी मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 351(2), 352 अन्वये एन.सी. क्रमांक 333/2026 नोंदविले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!