मलकापूर : भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव निमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मलकापूर तर्फे दि. ११ ते १९ एप्रिल दरम्यान विविध स्पर्धा व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे मलकापूर शहरात भगवान परशुराम जयंती निमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवित जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने यावर्षी दि. ११ व १२ एप्रिल रोजी तालुका क्रीडा संकुल येथे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परशुराम वॉरियर्स, परशुराम कॅपिटल व परशुराम लॉयल या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये परशुराम वॉरियर्स संघ विजेता ठरला.
दि. १४ एप्रिल रोजी ब्राह्मण सभा येथे लहान मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा ब्राह्मण सभा येथे घेण्यात आली. तसेच महिलांसाठी शहरातील बाहेती वंडर किड्स येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य उपक्रमांतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चे निमित्त जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत १२२ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. हृदय, मूत्ररोग व महिला मधील ब्रेस्ट कॅन्सर आरोग्य यांसारख्या विविध आजारांबाबत मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. दि. १६ एप्रिल रोजी डॉ. श्रेयश व्यवहारे यांच्या रुग्णालयात मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. १८ एप्रिल रोजी चांडक विद्यालय येथे विदर्भ कन्या मुक्ताईकृत ह. भ. प. तेजस्विनी ताई पाठक यांचे “आदर्श कुटुंबात माझी भूमिका” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.
दि. १९ एप्रिल रोजी सकाळी गौरक्षण येथे गौपूजन व जनावरांना चारा वितरण करण्यात आले. त्यानंतर जागर फाऊंडेशन या सहकार्यातून सकाळी १० वाजता पर्यावरणपूरक सायकल रॅली काढण्यात येऊन दुपारी १२ वाजता चांडक विद्यालय येथे जन्मोत्सव व आरती करण्यात आली. सायंकाळी ५.३० वाजता सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती.
ही शोभायात्रा चांडक विद्यालयातून सुरू होऊन कोंडवाडा रोड, लखानी चौक, मंगल गेट, किल्ला चौक, गांधी चौक, हनुमान चौक, बुलढाणा रोड मार्गे गाडगेबाबा चौक होत पुन्हा चांडक विद्यालय येथे समारोप करण्यात आले. विशेष म्हणजे, या शोभायात्रेत डीजेचा वापर न करता सांस्कृतिक,पारंपारिक वाद्यांच्या गजरात भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचे प्रमुख आकर्षण मध्ये परशुराम भगवान सजीव देखावा, तसेच ३० फूट उंच फलकाचे अनावरण आणि आतिश बाजी यांनी शहरातील लक्ष वेधले सदर जन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये विशेष म्हणजे श्रीकृष्ण पानट, राजेश देशपांडे , दिलीप सावजी , प्रमोद पाठक, संजय मांडवेकर या बांधवांनी नर्मदा माता परिक्रमा पूर्ण केल्या त्यांचे सत्कार करण्यातआले.
कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. या प्रसंगी शहरातील सर्व गणमान्य व्यक्ती, राजकीय पक्ष नेते मंडळी यांनी आपली उपस्थिती नोंदवली भगवान परशुराम यांचे पूजन व मल्यार्पण केले. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले