पाच वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल, खामगाव शहरातील घटना!

 

खामगाव : – शहरातील सतीफैल परिसरात अल्पवयीन बालिकेसोबत गैरवर्तन केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांची बालिका ही घराशेजारी राहणाऱ्या संतोष रामदास पवार (वय ५०) यांच्या घरी खेळण्यासाठी जात असे. १४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ती त्यांच्या घरी गेली होती. घरी परतल्यानंतर तिच्या वर्तनात बदल दिसल्याने आईने विचारपूस केली असता संबंधित प्रकार उघडकीस आला. आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेची संबंधित कलमे तसेच लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत कलम ४ व ८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल शिंदे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नागरिकांनी अशा घटनांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!