नांदुरा :- तालुक्यातील आंबोडा बरड येथे शेजाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आल्याने एका महिलेला मारहाण झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जलंब पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगला अनिल इंगळे (वय ३४, रा. आंबोडा फाटा, बरड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्या वादाची पार्श्वभूमी असतानाच पुन्हा वाद निर्माण होऊन संबंधितांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर जखमी महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तक्रारीवरून चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जलंब पोलिसांकडून सुरू आहे.
शेजारील वाद उफाळला; महिलेला मारहाण, जलंब पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा!
