मलकापूर : उमाळी गावात एका १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घराच्या आवारात घुसून युवतीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ६५ वर्षीय वृद्धाविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाळी येथील १९ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गजानन सहादू रोठे (वय ६५, रा. उमाळी, ता. मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २२ जून रोजी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आरोपीने त्यांच्या वाड्यात प्रवेश केला. त्यानंतर युवती झोपलेल्या ठिकाणी जाऊन तिचे तोंड दाबत अश्लील हेतूने स्पर्श करून विनयभंग केला. घटनेनंतर पीडित युवतीने मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. क्र. १२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय बाळूटाकरखेडे करीत आहेत.