Headlines

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन

मलकापूर : – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूर येथे विविध योगासने व प्राणायामाच्या प्रात्यक्षिकांसह योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही योगाभ्यासात सहभाग घेत निरोगी जीवनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योग प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. संदीप कौर यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे त्यांनी सांगितले. यानंतर क्रीडा शिक्षक आकाश लटके आणि प्रताप लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमात उपप्राचार्य अमोल चोपडे, प्रदीप कोलते यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
योग दिनाच्या निमित्ताने आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!