शाळेत जात असलेल्या शिक्षिकेला अडवून, ‘तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असे म्हणत मोबाईल क्रमांकची मागणी; तरुणावर गुन्हा
चिखली : शाळेत जाणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरत मोबाईल क्रमांक मागितल्याचा प्रकार चिखली शहरात समोर आला आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षिकेने चिखली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० वाजताच्या दरम्यान एका…
