Headlines

एसटी बस तपासणीदरम्यान मलकापूरच्या सहायक वाहतूक निरीक्षकास मेहकर मध्ये मारहाण; वाहकाविरुद्ध गुन्हा

मलकापूर : एसटी बसची तपासणी सुरू असताना प्रवासी रिपोर्ट मागितल्याच्या कारणावरून वाहकाने मार्ग तपासणी पथकातील सहायक वाहतूक निरीक्षकास शिवीगाळ करीत धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना मेहकर बसस्थानकावर घडली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी रिसोड आगारातील संबंधित वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर येथील रहिवासी संजय डिगंबर नारखेडे हे रा.प. महामंडळाच्या बुलढाणा विभागात सहायक वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत…

Read More

घराचा दरवाजा तोडून घुसले; तोडफोडीसह महिलेचा विनयभंग जुन्या वादातून कुटुंबावर हल्ला; १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा

बुलढाणा : जुन्या वादाची धुसफूस मनात ठेवून १० ते १२ जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाच्या घरावर धडक देत आधी घरासमोरील दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर दरवाजा तोडून घरात घुसत कुटुंबीयांना शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. याच गोंधळात एका महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कारंजा चौक परिसरातील तिरुपती मंगल कार्यालयासमोर ८ सप्टेंबर…

Read More

कब्रस्तान परिसरातून पाच शेळ्या-बकऱ्या लंपास; ६० हजारांचा फटका

देऊळगाव राजा : शेळ्या चारण्यासाठी सोडलेल्या ठिकाणी परतल्यानंतर एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन बकऱ्या आणि दोन लहान पिल्ले गायब असल्याचे निदर्शनास आले. शहरातील तहसील कार्यालयासमोरील कब्रस्तान परिसरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या शेळ्या-बकऱ्या चोरून नेल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकारामुळे शेळीपालन करणाऱ्या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला असून, देऊळगाव राजा पोलिसांनी…

Read More

कर्जदारांकडून वसुली केली; कंपनीत भरणा न करता रक्कम लाटल्याचा आरोप; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कर्जदारांकडून नियमितपणे वसूल केलेल्या हप्त्यांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार मलकापूर शहरातील स्पंदना स्फुर्ती फायनान्शियल लिमिटेडच्या शाखेत उघडकीस आला आहे. ऑडिटदरम्यान झालेल्या तपासणीत तब्बल १ लाख १९ हजार २५० रुपयांचा अपहार समोर आल्यानंतर शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा रोडवरील…

Read More

सहा महिन्यांनी अपघाताची नोंद; कारच्या धडकेत ६५ वर्षीय शेतकरी जखमी, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर :- रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्याला भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले. तब्बल सहा महिन्यांनंतर जखमी शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र वासुदेव पाटील (वय ६५, रा. चाळीसबिगा, मलकापूर) हे २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेनऊ…

Read More

कॉलेजला जाते सांगून घरातून निघाली, ६० हजार रुपयेही सोबत; २२ वर्षीय तरुणी बेपत्ता, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघालेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना मलकापूर शहरात समोर आली आहे. घरातून निघताना ती ६० हजार रुपये घेऊन गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फुकटपुरा,…

Read More

मंदिरातील किरकोळ वादातून तलवारीचा धाक; नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, बुलढाणा येथील घटना

बुलढाणा : देवीच्या आरतीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाने पुढे गंभीर स्वरूप धारण केल्याने बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांना तलवारीसह लोखंडी रॉड आणि बंदुकीसारखे शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवकांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,…

Read More

मलकापूर-बुलढाणा मार्गावरील अतिक्रमणावर जेसीबीचा हातोडा

मलकापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मलकापूर – बुलढाणा – चिखली राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला असून, मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवरही बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा आणि महामार्गाचे बीओटी तत्वावर काम घेतलेल्या बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कारवाईत दाताळा ते मलकापूर बसस्थानकादरम्यान रस्त्यालगत उभारलेली…

Read More

नोकरीच्या आमिषाने तब्बल २० लाख ७४ हजारांची फसवणूक; बनावट बँक कागदपत्रे तयार केल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कंपनीत मुलगा आणि जावयाला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत विविध व्यक्तींकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार मलकापूर शहरात समोर आला आहे. नोकरीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दिलेली रक्कम परत मागितल्यानंतर बनावट बँक कागदपत्रांच्या माध्यमातून व्यवहार खरा असल्याचे भासविल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल २० लाख ७४ हजार १४० रुपयांची फसवणूक झाल्याचे…

Read More

विहिरीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह; पिंप्रीगवळी शिवारातील घटना; मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार

पिंप्रीगवळी : शेतातील विहिरीजवळ आलेल्या दुर्गंधीचा शोध घेतल्यानंतर विहिरीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने पिंप्रीगवळी शिवारात खळबळ उडाली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गूढ शवविच्छेदन अहवालानंतरच उकलणार आहे. शेतकरी राजेंद्र भगवान पवार हे…

Read More