Headlines

सहा महिन्यांनी अपघाताची नोंद; कारच्या धडकेत ६५ वर्षीय शेतकरी जखमी, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर :- रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्याला भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले. तब्बल सहा महिन्यांनंतर जखमी शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र वासुदेव पाटील (वय ६५, रा. चाळीसबिगा, मलकापूर) हे २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान हिरो डिलक्स दुचाकी (एमएच २८ बीआर १५२०) घेऊन निंबारी फाट्याजवळून जात होते. याचवेळी रामचंद्र ज्ञानदेव डहाके (रा. एकता नगर, बुलडाणा) हे स्विफ्ट डिझायर कार (एमएच २८ बीके ३९८०) घेऊन जात होते. कार भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने पाटील यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धडकेनंतर पाटील हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उजव्या बाजूच्या खांद्याजवळ फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातानंतर उपचार व अन्य कारणांमुळे तक्रार दाखल होण्यास विलंब झाला. अखेर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१० वाजता मलकापूर शहर पोलीस ठाण्यात कारचालक रामचंद्र डहाके यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची नेमकी परिस्थिती, वाहन चालविताना झालेला निष्काळजीपणा आणि इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेले करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल शिमरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!