“मलकापूरात गटार गच्च, प्रशासन गप्प! बुलढाणा रोडवर सांडपाण्याचा कहर; दुकानदारांचे आरोग्य धोक्यात”
मलकापूर ( दिपक इटणारे ) : शहरातील गजबजलेल्या बुलढाणा रोड परिसरात नाल्या गच्च भरल्या असून, सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. या सांडपाण्याला मार्गच नसल्याने ते थेट व्यावसायिकांच्या दुकानांसमोर जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाल्यांमध्ये साचलेली घाण, प्लास्टिक कचरा आणि अडथळ्यांमुळे…
