Headlines

बिअर शॉपी फोडून लाखोंचा माल लंपास; अज्ञातांविरुद्ध गुन्हा! अंढेरा परिसरातील घटना

अंढेरा :- परिसरातील मेरा बु. येथील बिअर शॉपीवर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत सुमारे ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल पडघान यांच्या मालकीची मेरा बु ते फाटा रोडवरील बिअर शॉपी नेहमीप्रमाणे रात्री बंद करण्यात आली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी संधी साधत दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील बिअरच्या बाटल्या, काउंटरमधील सुमारे ८० हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सुमारे २ तोळ्यांची सोन्याची साखळी असा एकूण अंदाजे ४ लाख २८ हजार १४० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसानही केल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!