कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवान संजयसिंह राजपूत यांना माजी सैनिकांचे अभिवादन

मलकापूर : कारगिल विजय दिनानिमित्त तालुक्यातील माजी सैनिकांनी एकत्र येत शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी शहीदांच्या अद्वितीय शौर्य, देशभक्ती आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमात तालुका सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष नामदेवसिंग राजपूत, सुबेदार मेजर भास्कर पाधर, सैनिक फेडरेशनचे तालुका उपाध्यक्ष सुबेदार मुरलीधर झनके, सुबेदार कृष्णा खराटे, मोहम्मद शकील, मनोहर नरवाडे, अशोकसिंग राजपूत, विठ्ठल मोरे, सुधीर पाचपांडे, मनोहर जावरे सर, माणिक खराटे आणि सुमित तायडे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याला सलाम करत, देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांचे स्मरण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे सांगितले. कार्यक्रमात शहीद संजयसिंह राजपूत यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!