बेलाडमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मलकापूर : तालुक्यातील बेलाड गावात ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून मलकापूर शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मृत युवकाचे नाव राजेंद्र गजानन संबारे (वय ३२, रा. बेलाड, ता. मलकापूर) असे आहे. गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ते घरी आले. काही वेळ विश्रांती घेण्यासाठी खोलीत जात असल्याचे त्यांनी घरच्यांना सांगितले. त्यानंतर दुपारच्या सुमारास घरातील एक महिला कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता, राजेंद्र यांनी टिनपत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यांना तत्काळ खाली उतरविण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी मृतकाचे भाऊ विजय गजानन संबारे यांनी दिलेल्या माहितीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!