प्रा. ॲड. कौस्तुभ चंद्रवदन इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची ‘आचार्य’ (Ph.D.) पदवी जाहीर
मलकापूर : – येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयाचे वाणिज्य विभागातील प्रा. ॲड. कौस्तुभ चंद्रवदन इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्याकडून वाणिज्य शाखेतील ‘आचार्य’ (Ph.D.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रा. इंगळे यांनी “पश्चिम विदर्भातील संघटित व…
