तरुणाचे टोकाचे पाऊल; घाटपुरीत गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : तालुक्यातील घाटपुरी जुनेगाव येथे २२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव करण संजय सरडे (वय २२, रा. घाटपुरी जुनेगाव, ता. खामगाव) असे आहे. याप्रकरणी त्यांचे वडील विजय बाबुराव सरडे (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास करण हा घरी जात असल्याचे सांगून बाहेर पडला होता. त्या वेळी त्याची आई बाहेरगावी गेली होती. दरम्यान, रात्रीच्या सुमारास करण याने स्वतःच्या राहत्या घरात छतावरील लोखंडी हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. युवकाने आत्महत्या का केली, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!