नूतन इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन
मलकापूर :- स्थानिक नूतन इंग्लिश स्कूल मलकापूर मध्ये आज मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी व पालखी सोहळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी शाळेत पालखीचा रिंगण सोहळा आयोजन करण्यात आले . एरवी रोज शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी आज वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवा झेंडे ,टाळ, तुळशी वृंदावन घेऊन आले होते. सुरुवातीला शाळेतील शिक्षक प्रशांत खर्चे सर…
