अन्नदात्यांचा सन्मान, सेवेचा अभिमान; जाणीव फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त शेतकरी गौरव
मलकापूर :- समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जाणीव फाऊंडेशनने आपल्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त दिव्यांग महिला शेतकऱ्यासह दोन कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा सन्मान करून अन्नदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दाताळा येथे झालेल्या या गौरव सोहळ्यात शाल, टोपी, श्रीफळ व रोख सन्मान देत शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. दि. ३ जुलै रोजी दाताळा येथे आयोजित शेतकरी सन्मान…
