मलकापूर : विवरा येथील एका इसमाने विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतक भिमराव शेषराव पाटील (रा. विवरा, ता. मलकापूर) यांनी १३ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते. प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी त्यांना प्रथम मलकापूर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील मेहेत्रे हॉस्पिटलमध्ये १५ ते १७ जूनदरम्यान दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत डॉ. राहुल मेहेत्रे यांच्या वतीने कक्षसेवक हार्दीक संतोष मोरे यांनी माहिती दिल्यानंतर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात प्रथम मर्ग दाखल करण्यात आला होता. घटनास्थळ एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने प्रकरण वर्ग करून १ जुलै रोजी आकस्मिक मृत्यू क्र. २०/२०२६ कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुभाष सरकाटे करीत आहेत.