वीज तारा चोरीचा प्रकार; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास! नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीची घटना
नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी शिवारात वीज तारा चोरीचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ७ ते ८ एप्रिलदरम्यान घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोजने रोहित्र परिसरातील सहा गाळ्यांमधून तीन फेज, चार वायर प्रणालीतील सुमारे १२०० मीटर लांबीची वीज तार चोरीला गेली आहे. या…
